Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याफैजपूर येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

फैजपूर येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

फैजपूर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय येथे राष्ट्रीय सण उत्सव समिती व एन एस एस विभागातर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी तापी परिसर विद्या मंडळाचे कार्यकारी सदस्य रामा परशुराम पाचपांडे आणि कला, विज्ञान महाविद्यालय पालचे प्राचार्य डॉ.पी. एस.लभाने व उपप्राचार्य डॉ. एस व्ही जाधव,डॉ. व्ही.सी. बोरोले, प्रा. डी.बी. तायडे, हिंदी विभाग प्रमुख डॉ .कल्पना पाटील,क्रीडा विभाग प्रमुख डॉ.गोविंद मारतळे तसेच महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी श्री.पाचपांडे यांनी लोकमान्य टिळक आणि शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. त्यासोबतच प्राचार्य लभाने यांनी ही दोन्ही विभूतींच्या जीवन कार्यावर प्रकाश प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ.मारोती जाधव यांनी केले तर आभार एन.एस.एस विभाग सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.शेरसिंग पाडवी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या