Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावफैजपूर येथे स्त्री- पुरुष समानता या विषयावर व्याख्यान

फैजपूर येथे स्त्री- पुरुष समानता या विषयावर व्याख्यान

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

फैजपूर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर फैजपूर इतिहास विभाग आणि आय. क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री- पुरुष समानता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा.डॉ.जगदीश खरात यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री-पुरुष समानता विषयक विचार’ विषयावर प्रकाश टाकला त्यांनी हिंदू कोड बिल, राज्यघटनेतील स्त्रियांना दिलेले अधिकार, भारतीय समाज व्यवस्थेत खोलवर रुजलेली विषमता, स्त्रियांवर होणारे अन्याय, पितृसत्ताक संस्कृती, मनाविरुद्ध झालेले विवाह आणि लादली जाणारी बाळंतपणे या बाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार समजावून सांगितले, यावर उपाय म्हणून स्त्रियांनी शिक्षण घेतले पाहिजे हा विचार समाजात रुजण्यासाठी बाबासाहेबांनी लेखांतून-व्याख्यानांतून मांडणी केली व सर्वच जाती समूहातील स्त्री वर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले.त्या बाबत उपाय योजना केली अस्या प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री-पुरुष समानता विषयक राज्यघटनेत केलेल्या तरतुदीची माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य प्रा.डी.बी.तायडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे कट्टर समर्थक होते. त्यांच्यावर महात्मा गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रचंड प्रभाव होता. बाबासाहेबांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत.असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.मारोती जाधव यांनी केले व अभार डॉ.ताराचंद सावसाकडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या