Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमबँकेचे थकीत कर्ज प्रकरण; कोर्टाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश..

बँकेचे थकीत कर्ज प्रकरण; कोर्टाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश..

अमळनेर/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सध्या जिल्ह्यात फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.पीपल्स बँकेकडून कर्ज घेऊन फेडले नाही अशा कर्ज बुडव्या डी डी केमिकल्सचा मालक अशोक पाटील याने भामटेगिरी करीत थकीत कर्जपोटी पीपल्स बँकेने जप्त केलेली मालमत्ता परस्पर विकून घाट घातला. मात्र बँकेने या भामट्याविरुद्ध न्यायालयात दाद मागितल्याने न्यायालयाच्या आदेशाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की अशोक धुडकू पाटील (वय ४५) याने औद्योगिक वसाहत मंगरूळ येथे उभारलेल्या डी डी केमिकल्स कंपनीसाठी शिरपूर पीपल्स बँकेकडून ४२ लाख रुपये मुदतीचे कर्ज आणि २० लाख रुपये खेळते भांडवल रोख रक्कम घेतली होती. मात्र कर्ज फेडण्याची क्षमता न ठेवता करीत कर्ज भरण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. बँकेने कर्ज फेडण्यासाठी पाठपुरावा केला.अशोक पाटील यांनी कर्ज न फेडल्याने बँकेने त्यांच्या मंगरूळ येथील औद्योगिक वसाहत मधील गट नंबर ६८३ / १ मधील प्लॉट नंबर ८३ च्या डी.डी. केमिकल्स वर सहाय्यक निबंधक यांच्या परवानगीने जप्ती बोजा लावला होता. तरीही त्याने कर्ज फेडले नाही. दिवसेंदिवस मुजोरीपणा वाढतच गेला. पाटील याने कर्ज न फेडण्याचा कहर केल्याने अखेर केमिकल युनिटची अपसेट प्राईझ काढण्यासाठी बँकेचे अधिकारी औद्योगिक वसाहतीत गेले,मात्र त्या जागेत मशिनरी जागेवर आढळली नाही,असा प्रकार पाहून ते अचंबित झाले. मशिनरी दुरुस्तीसाठी पाठवली आहे असे उडवाउडवीची दिली. याबाबत शिरपूर याबाबत शिरपूर पीपल्स बँकेचे वसुली अधिकारी नरेंद्र रघुनाथ माळी यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर बँकेने नियमाप्रमाणे न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने अशोक पाटील यांच्या विरुद्ध फसवणुकीचा व जप्त मालमत्ता परस्पर विकून अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.दरम्यान या असल्या प्रकारची व्यावसायिक व विविध कंपनी मालकांमध्ये चर्चा होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या