Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeक्राईमबांभोरी:आशिष शिरसाळे हत्या प्रकरण संशयितासह महसूल अधिकारी पोलिसांच्या ताब्यात....!

बांभोरी:आशिष शिरसाळे हत्या प्रकरण संशयितासह महसूल अधिकारी पोलिसांच्या ताब्यात….!

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- बांभोरी शिवारात काल कुऱ्हाडीने खुनाची घटना घडली होती. या खूनाच्या गुन्ह्यात संशयीत आरोपीसोबत भ्रमण करणारा महसूल अधिकारी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. या महसूल अधिका-यासोबत मुख्य संशयीत आरोपीस देखील ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना धरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेमुळे स्थानिक महसूल प्रशासनात खळबळ माजली आहे. तसेच विविध चर्चेला उत आला आहे. गेल्या २३ जून शुक्रवार रोजी गिरणा नदी पात्रात बांभोरी शिवारात बाळा उर्फ आशिष प्रकाश शिरसाळे या बावीस वर्षाच्या तरुणाचा लोखंडी हत्याराने हल्ला करुन खून करण्यात आला होता. या घटने प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला २४ जून रोजी भल्या पहाटे सव्वा तीन वाजता प्रकाश आनंदा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाग ५ गु.र.न. 204/23 भा.द.वि. 302 नुसार दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी करत होते.

या घटनेला महिलेच्या संबंधाची किनार लाभली आहे, त्यातूनच हा खून झाला असल्याचे तपासात पुढे झाले आहे. या घटनेच्या तांत्रीक तपासा दरम्यान छोटू उर्फ प्रमोद भिमराव नन्नवरे हा संशयीत आरोपी असल्याचे दिसून आले. फरार छोटु उर्फ प्रमोद नन्नवरे याच्यासोबत महसूल विभागाचा मंडल अधिकारी अमोल विक्रम पाटील हा देखील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आपण एका संशयीतासोबत भ्रमंती करत असल्याचे समजल्यानंतर देखील मंडल अधिकारी अमोल विक्रम पाटील याने पोलिस प्रशासनास सहकार्य न करता तसेच माघारी न येता पुढील प्रवास केल्याचे समजते. अखेर दोघांना उस्मानाबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपीस पुढील तपासकामी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, धनगर यांच्यासह अनेकांनी महत्वपूर्ण कामगिरी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या