Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमबापरे; अचंबित घटना...नववीच्या मुलाच्या... दप्तरात गावठी पिस्तूल...!

बापरे; अचंबित घटना…नववीच्या मुलाच्या… दप्तरात गावठी पिस्तूल…!

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या अकलूद शिवारातील नामांकीत स्कूलमध्ये नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात चक्क गावठी कट्टा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या घटनेने सगळेच जण अचंबित झाले आहेत. भुसावळ शहरापासून जवळच अकलूद शिवारात ही नामांकीत स्कूल आहे. आज सकाळी येथील शिक्षकांनी नियमीतपणे विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली असता नववीच्या विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळून आला. यामुळे शिक्षकांना धक्काच बसला. या संदर्भातील माहिती शाळेच्या प्रशासनाला देण्यात आली.यानंतर सदर विद्यार्थ्याच्या विरोधात फैजपूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे. गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. एका प्रतिष्ठित शाळेतील विद्यार्थ्याकडे गावठी पिस्तूल आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या