Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावबारी समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक भवनासाठी मदत करू- पालकमंत्री

बारी समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक भवनासाठी मदत करू- पालकमंत्री

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- बारी समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक भवनासाठी मदत करू असे बारी समाजातर्फे आयोजित गुणवंतांचा सत्कार समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्वाही दिली.जळगाव बारी पंचमंडळातर्फे खोटे नगर येथील दीप लक्ष्मी सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री बोलत होते. अध्यक्षपद प्राचार्य उत्तमराव फासे यांनी भूषविले. व्यासपीठावर आमदार राजूमामा भोळे, नगरसेविका शोभा बारी, माजी सिनेट सदस्य प्रा.नितीन बारी, पत्रकार मनोज बारी, भारतीय महासंघ तथा शेगाव अधिवेशनाचे अध्यक्ष रमेश घोलप, सामाजिक कार्यकर्ते रतन फुसे ( दारू बंदी अधिकारी खामगाव), मंगला बारी, बारी पंच महिला उपाध्यक्ष सीमा बारी, बारी पंचमंडळ माजी अध्यक्ष यशवंत बारी, बारी समाज महिला अध्यक्ष इंदु फुसे, संतोष बनसोडे भुसावळ, विजय बारी कुर्हा पानाचे, सुनील बुंदे पिंप्राळा, भास्कर बारी, रमेश डबे, माजी अध्यक्ष अवधूत कोल्हे , जामनेरचे प्रा. बारी आदी उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठे झाल्यानंतर समाजाला विसरू नये.मात्र दुर्दैवाने काहीजण समाजाची ओळख दाखवीत नाही. यामुळे खरोखर कोणताही समाज असो तो मागे राहतो.दान देण्याची दानत असली पाहिजे, अलीकडच्या काळात मुलीचा बाप म्हणून प्रत्येकाला काळजी वाटते, त्यामुळे शाप असलेल्या मोबाईल कडे दुर्लक्ष करा. नोकरीपेक्षा स्वतः चार जणांना नोकऱ्या उपलब्ध करून देता येईल, असा उद्योग धंदा उभारा, असे आवाहन त्यांनी केले. जळगाव येथे होत असलेल्या बारी समाज मंगल कार्यालयासाठी आपली मदत करण्याची भूमिका आहे. जास्तीत जास्त मदत करण्यात येईल व शासनातर्फे देखील मदत मिळवून देऊ, असे आश्वासन जळगावचे राजमामा भोळे यांनी यावेळी दिले. गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींनी केवळ एकाच क्षेत्राकडे न वळता वेगवेगळे नवीन क्षेत्र निवडावे जेणेकरून समाजाचे नाव मोठे होईल, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला ४०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवात समाजाचे आद्य संत श्री रूपलाल महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विजय बारी यांनी मांडले. कार्यक्रमाप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मान्यवरांनी केले. मन्यारखेडा येथे गट नंबर एक येथे समाज भवना कामी समाज संस्थेने मी 2023 मध्ये 11000 स्क्वेअर फुट जागा खरेदी करून तेथे बांधकामाची सुरुवात झाली असून आज पर्यंतचे अपडेट समाजासमोर मांडण्यात आले. सदर समाज भवनात तीन मजली भव्य सभागृह ज्या तळमजला भोजनगृह पहिला मजला लग्न हॉल आणि तिसरा मजला समाजातील बाहेरगावावरून अतिथी लोकांच्या रहिवासासाठी तथा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधकामाचा आराखडा समाजासमोर आणि मान्यवरांसमोर मांडण्यात आला. सूत्रसंचालन सी ए राहुल पाटील व अनिल वराडे यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव लतीश बारी यांनी केले. यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण बारी, खजिनदार बाल मुकुंद बारी ,उपसचिव महेंद्र बारी, प्रसिद्ध प्रमुख नितीन बारी ,राजेंद्र बारी, सागर बारी ,राहुल पाटील, हर्षल बारी, विजय पूना बारी,अनिल बारी कमलेश बारी अतुल बारी ,विनोद बारी ,यांनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या