अमळनेर/प्रतिनिधी- खरेदी केलेल्या बखळ जागेला ग्रामपंचायत तीन वर्षांपासून नाव लावत नसल्याने करणखेडे येथील गणेश गुरव तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेले होते. अखेर एपीआय शितलकुमार नाईक यांनी मध्यस्थी करत बीडीओंच्या लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील करणखेडे गावात शांताबाई पुंडलिक पाटील यांची २२.३० चौरस मीटर बखळ जागा शांताराम काशिनाथ गुरव यांनी २०२० पासून खरेदी केली असून आजपर्यंत ती जागा नावे लागलेली नाही. खरेदी खत आणि इंडेक्स सूची २०२० पासून देऊनही त्याची नमुना नंबर ८ ला नोंद नाही. त्यामुळे नाव लावून घेण्यासाठी शांताराम राव यांचे चिरंजीव गणेश गुरव यांनी १५ ऑगस्टपासून पंचायत समिती कार्यालयात उपोषणाला बसले होते. मात्र प्रशासनाकडून उपोषण सोडवण्यासाठी कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. स्वातंत्र्य दिनापासून उपोषणासाठी बसलेल्या गणेश गुरव यांची प्रकृती खालावत असल्याने एपीआय शितलकुमार नाईक यांच्यासह अनेकांनी मध्यस्थी करत बीडीओ सुशांत पाटील यांनी ग्रामपंचायतीला पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देत लेखी पत्र दिल्याने गुरव यांनी तिसऱ्या दिवशी दिनांक १७ रोजी रात्री ८:३० वाजता उपोषण मागे घेतले.
बीडीओ यांच्या आश्वासनानंतर गुरव यांचे उपोषण मागे
RELATED ARTICLES