Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedबुरखा घातल्यामुळे विद्यार्थिनींना महाविद्यालयांत प्रवेशबंदी; चेंबूर येथील आचार्य मराठे कॉलेजमधील प्रकार

बुरखा घातल्यामुळे विद्यार्थिनींना महाविद्यालयांत प्रवेशबंदी; चेंबूर येथील आचार्य मराठे कॉलेजमधील प्रकार

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- चेंबूर येथील एन. जी. आचार्य आणि डी. के.मराठे महाविद्यालयात बुरखा घालून आलेल्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. शिक्षण संस्थेत बुरखा घालून प्रवेश करण्याची गेल्या वर्षी कर्नाटक येथे झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती मुंबईत झाली आहे. चेंबूर येथील एन.जी.आचार्य आणि डी.के.मराठे महाविद्यालयात बुरखा घालून आलेल्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दुपारी महाविद्यालयासमोर आंदोलन केले. दरम्यान यंदापासून महाविद्यालयाने गणवेश लागू केला आहे. त्याबाबत विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती, असे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर महाविद्यालयाने ८ ऑगस्टपर्यंत निर्णयाला स्थगिती दिली आहे.चेंबूरमधील एन. जी. आचार्य आणि डी.के. मराठे महाविद्यालयात गोवंडी-शिवाजी नगर परिसरातील अनेक मुस्लीम विद्यार्थीदेखील शिक्षण घेतात. कनिष्ठ महाविद्यालयातील काही विद्यार्थिनी बुधवारी दुपारी बुरखा घालून आल्या. या महाविद्यालयात मात्र, बुरखा घालून आलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच अडवण्यात आले. त्यामुळे महाविद्यालयातील मुस्लीम विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालयासमोर आंदोलन सुरू केले. महाविद्यालयात गणवेश घालणे बंधनकारक आहे. मात्र,आम्ही दुरून महाविद्यालयात येतो. सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरतो. प्रवासात तो कुठे बदलायचा? महाविद्यालयाने बुरखा असतानाही आवारात प्रवेश द्यावा आणि तेथे कपडे बदलण्यासाठी जागा द्यावी, असे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. विद्यार्थिनींच्या आंदोलनानंतर बुरखा घातलेला असला तरी महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश देण्याचा निर्णय महाविद्यालयाने उशिरा घेतला. विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश देण्यात येईल. मात्र, विद्यार्थिनींनी स्वच्छतागृहामध्ये बुरखा बदलून तासिकांना किंवा महाविद्यालयातील इतर उपक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या आवारात बुरखा घालून फिरण्यास परवानगी नाही, असे महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे. गणवेश अंमलबजावणीचा नियम ८ ऑगस्टपर्यंत स्थगित करीत आहोत. तोपर्यंत विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेण्यात येईल आणि पुन्हा ९ ऑगस्टपासून गणवेशाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विद्यागौरी लेले यांनी सांगितले.महाविद्यालयात शिक्षकांची एक बैठक झाली. विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना असावी, भेदभाव होऊ नये, त्याचबरोबर प्रयोगशाळेत बुरखा घालून वावरणे धोकादायक आहे. त्यामुळे गणवेश असावा अशी सूचना शिक्षकांनी केली होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या