Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावबेलाच्या पानावर अवतरले महादेव; श्रावण सोमवारनिमित्त चित्रकार दाभाडे यांनी रेखाटले सुरेख चित्र

बेलाच्या पानावर अवतरले महादेव; श्रावण सोमवारनिमित्त चित्रकार दाभाडे यांनी रेखाटले सुरेख चित्र

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  मानव सेवा विद्यालय जळगाव येथील कलाशिक्षक उपक्रमशील शिक्षक चित्रकार सुनिल न्हानू दाभाडे यांनी चक्क बेलाच्या पानावर अवतरले भगवान महादेव यांचे सुंदर असे चित्र रेखाटले आहे.चार इंचाचा बेलाचा पानावर ऍक्रेलिक रंगाच्या वापर केलेले आहे.पेन्सिल रबर न वापरता ब्रस च्या साह्याने फक्त 15 मिनिटांमध्ये चित्र साकारलेले आहे.याआधीही जगातील पहिल्यांदा ज्वारीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटून ओएमजी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तसेच वर्ल्ड रेकॉर्ड लंडनमध्ये या भाकरीच्या पेंटिंगची नोंद झाली आहे. तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ही केलेले आहे. तव्यावरची कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे चित्र आणि काढलेले आहे .नवरात्र मध्ये चक्क सुपारी नऊ दिवसाचे नऊ देवी रेखाटलेले आहे असे नवनवीन उपक्रम राबवून चित्रकार सुनील दाभाडे यांनी आपले व आपल्या शाळेचे नाव जगाच्या पाठीवर नेलेले आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर. एस. डाकलिया ,मानस सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी सदस्य प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका माया अंबटकर माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांनी चित्रकार सुनिल दाभाडे सरांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या