Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रबोरामणी येथे श्रीराम मंदिर भूमीपूजन व भव्य मिरवणूकीचे आयोजन

बोरामणी येथे श्रीराम मंदिर भूमीपूजन व भव्य मिरवणूकीचे आयोजन

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह..

सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- श्रीराम जन्मोत्सव सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शुक्रवार दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी हे होते.सर्व मान्यवरांचे शुभेहस्ते श्रीराम मंदिर भुमीपुजन करण्यात आले त्यानंतर या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी भाजपचे युवा नेते उदयशंकर पाटील तसेच कार्यक्रमाचे आयोजन केदारलिंग विभुते यांनी लोकप्रधान न्यूज चॅनल शी बोलताना अधिक माहिती दिली.
संपूर्ण बोरामणी गावातुन श्रीराम यांची भव्य दिव्य स्वरूपाची मिरवणूक काढण्यात आली.या कार्यक्रमास सोलापूर चे खासदार डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यासह अक्कलकोट तालुक्याचे आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील,युवा नेते उदयशंकर पाटील,माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रामाप्पा चिवडशेट्टी,अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष मोतीराम राठोड, जिल्हा नियोजन समिती सदस्य आण्णाराव बाराचारे, तुळजापूरचे सभापती पिंटु मुळे,युवा उद्योजक सागर कत्ते,तालुका चिटणीस सुनील कळके,भाजपचे माजी अध्यक्ष सिध्दाराम हेले,मधुकर चिवरे, तांदुळवाडी चे सामाजिक कार्यकर्ते नागनाथ भडंगे यांच्यासह बोरामणी गावचे सरपंच प्रकाश आवटे,उपसरपंच नुरोद्दिन पठाण यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,चेअरमन भारत कवडे,व्हा.चेअरमन केशव धोत्रे व ग्रामस्थ बहुसंख्येंने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक व आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारलिंग विभुते यांनी केले होते.तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, स्वप्निल ईज्जपवार पोलिस उपनिरीक्षक निंबाळकर, बीटचे बीट अंमलदार पोलिस हवालदार प्रदीप बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या