Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याभडगाव तालुक्यातील " त्या " चिमुकलीला न्याय देण्यासाठी आरोपीला फाशी द्या; निकम...

भडगाव तालुक्यातील ” त्या ” चिमुकलीला न्याय देण्यासाठी आरोपीला फाशी द्या; निकम यांच्यासारखा वकील देऊ: मुख्यमंत्री

भडगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली . या घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी हजारोच्या संख्येने भडगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर मूक विराट मोर्चा काढला.दुसरीकडे या घटनेचे पडसाद आज विधानसभेतही जोरदार उमटले. आमदार किशोर पाटील यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासारखा चांगला वकील देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पीडित मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधत दोषीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

भडगाव तालुक्यातील या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.या घटनेबाबत पाचोरा भडगाव तालुका मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार पाटील यांनीही अधिवेशानात संशयिताला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. दुसरीकडे या घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आज भडगाव पोलीस स्टेशनवर विराट मूक मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत या ठिकाणाहून आम्ही जाणार नाही, असा पावित्रा मोर्चात सहभागी पीडितेच्या कुटुंबियांनी तसेच ग्रामस्थांनी घेतला. त्यावर या पाचोरा- भडगाव मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पीडितेच्या कुटुंबियांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणे करुन दिले. वडिलांशी संपर्क साधत त्यांच्या परिवाराचे सांत्वनही केले. या सात वर्षीय चिमुकलीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यानंतर मोर्चाचे आयोजनकर्त्यांनी या पीडित चिमुकलीला सामूहिकपणे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोर्चा प्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या