Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रभाजपचे आमदार सुभाष देशमुख यांचे पाटबंधारे कार्यालय समोर ठिय्या आंदोलन

भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांचे पाटबंधारे कार्यालय समोर ठिय्या आंदोलन

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह..

सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- पाटबंधारे विभागामार्फत दक्षिण तालुक्यातील सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये टेल एंडपर्यंत पाणी सोडलेले नाही. या उदभवलेल्या पाण्याच्या प्रश्नी दक्षिण सोलापूर तालुक्याचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी शनिवारी शेतकऱ्यांना घेऊन सिंचन भवन, गुरूनानक चौक या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.

यावेळी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व उपविभागीय अधिकारी शिरीष जाधव यांनी देशमुख यांच्याशी बराच वेळ चर्चा केली पण तोडगा निघाला नाही, जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या