Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याभाजपा प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात चित्रपट कामगार आघाडीच्या कार्याचा आढावा

भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात चित्रपट कामगार आघाडीच्या कार्याचा आढावा

नाशिक/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नाशिक भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानेतृत्वात भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी चित्रपट कामगार आघाडीचे पालक, भाजप प्रदेश महामंत्री संजय केनेकर, कार्यालयीन प्रमुख मा रविंद्र अनासपुरे तसेच महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीशी संलग्न असणाऱ्या व चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माता, दिग्दर्शक यांचे न्याय हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे काम असेच स्वतंत्रपणे सुरू राहणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

भाजपा सांस्कृतिक आघाडी प्रकोष्ट संयोजक प्रिया बेर्डे आणि भाजपा चित्रपट कामगार आघाडी संयोजक विजय सरोज यांच्या नेतृत्वात काम सुरू ठेवेल असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप प्रदेश महामंत्री संजय कनेकर यांनी सांगितले.यावेळी कला क्षेत्र आणि पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या