Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याभाजप आदिवासी मोर्चाचे आदिवासी विकासमंत्र्यांना निवेदन

भाजप आदिवासी मोर्चाचे आदिवासी विकासमंत्र्यांना निवेदन

चांदवड/विशेष प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्यावतीने आदिवासी विकास मंत्री यांचेकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना आदिवासींच्या अभिव्यक्तीसाठी शासकीय स्तरावर मुखपत्र ( मासिक ) प्रकाशित करण्याची मागणीचे निवेदन सादर केले. या मासिकात ‘ आदिवासींच्या शासकीय योजना ,लाभार्थ्यांचे मनोगत ,व गाव पाड्यावरील लोकसंस्कृतीचे लेख ‘ प्रकाशित व्हावे या अपेक्षेने निवेदन दिले.

चांदवड येथील शासकीय आदिवासी मुला / मुलींच्या वसतीगृहाकडे जाणारा रस्ता करून मिळावा तसेच रस्त्याच्या दुतर्फावर सौरदिप बसविण्यात यावे यासंदर्भातील निवेदन चांदवड तालुका भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा चे तालुकाध्यक्ष संजय पाडवी यांनी दिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या