जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव भाजपा प्रदेश कार्यालय नरिमन पॅाईंट, मुंबई येथे पार पडलेल्या भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथील अमित दिलीप सोळुंके यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीस स्वयंसेवक संघ ते भाजपा युवा मोर्चात कार्य करणाऱ्या एका आदिवासी कोळी तरूणाला प्रदेश स्तरावर कार्य करण्याची जबाबदारी व संधी देवून पक्षाने गौरव केल्याची भावना समाज मनात या निमित्ताने निर्माण झाली आहे.नियुक्ती बद्दल ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीष महाजन, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस योगेश मैंद, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), खासदार उन्मेष पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष सौ. उज्वला बेंडाळे, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष जावळे, माजी जि. प समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.