जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भादली येथील गांधी विद्यालयात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.के. धनगर यांनी विद्यार्थ्यांना योग बाबत माहिती देवून विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली.श्रीमती शुभांगी पाटील यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले. जी. बी. चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रजापती ब्रह्मकुमारी अश्विनी दीदी यांनी विद्यार्थ्यांकडून मेडीटेशन करून घेतलं.विद्यार्थ्यांनी योगाचे महत्च जाणून घेवून आनंदाने प्रात्यक्षिके केलीत.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक बंधू भगिनी आणि कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.