Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावभारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुस्तक भिशीतर्फे कार्यक्रम

भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुस्तक भिशीतर्फे कार्यक्रम

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावतर्फे माजी राष्ट्रपती तथा मिसाईन मॅन डॉ.कलाम यांची पुण्यतिथी दीपक साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली अथर्व प्रकाशनाच्या कार्यालयात झाली. प्रमुख अतिथी शाकीर शेख,सुनिल महाजन ( महाराष्ट्र माळी समाज महासंघ,जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष ),चेतन अहिरराव,दीपक माळी,उपस्थित होते. प्रारंभी साळुंके आणि शाकिर शेख यांच्या हस्ते डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच माल्यार्पण करण्यात आले. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम लिखित पुस्तके व त्यांच्या जीवनावरील चरित्रात्मक, वैचारिक ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. फित कापण्याच्या सोपस्काराऐवजी ‘ युवा गीत ‘साळुंके यांनी सादर केले. शिक्षकांनी करायची ‘ दशसूत्री प्रतिज्ञा ‘ विजय लुल्हे यांनी सादर केली.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या लेखन कार्य व ग्रंथ प्रेमाची माहिती डॉ. कलाम पुस्तक भिशीचे प्रमुख लुल्हे यांनी दिली.डॉ.कलाम यांच्या अनोख्या सामाजिक कार्याची माहिती श्री. महाजन यांनी दिली. कार्यक्रमास लोकेश शिंदे, पंकज जाधव ग्रंथप्रेमी उपस्थित होते. आभार सुनिल पाटील यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गिरीष चौधावकर,शरद महाजन, सागर महाजन यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या