Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedभारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर केतनभाई शहा यांनी निवड.

भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर केतनभाई शहा यांनी निवड.

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह..
सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:-सोलापूर जगातील उत्कृष्ट अशी सामाजिक काम करणारी संस्था म्हणून भारतीय जैन संघटने ला गौरवण्यात आले आहे. ह्या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी वर 1997 पासून जैन संघटनेच्या विविध पदावर काम करून संघटनेचे नावलौकीक वाढवले असून संस्थापक शांतीलालजी मुथा व राष्टीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांनी सोलापूर च्या केतनभाई शहा यांच्या नावाची घोषणा केली आहे. राज्य अध्यक्ष नंदू साकला व सचिव दीपक चोपडा यांनी केतनभाई यांचे अभिनंदन केले.

भारतीय जैन संघटना ही संस्था देश विदेशात सामाजिक काम करत असते,प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती वेळी सर्वात पहिला पोहचून मदत कार्य व तन मन धनाने सहकार्य करत असते. आपल्या जवळील किल्लारी भूकंपाच्या वेळी पहिला पोहचून पीडितांच्या जेवणाची व्यवस्था करणारी तसेच तेथील 1200 अनाथ मुले दत्तक घेऊन 15 बस द्वारा पुणे वाघोली येथे घेऊन त्यांचे पुनर्वसन केले,त्याचे शिक्षण,राहण्या जेवण्याची व्यवस्था करून त्यांना प्रवाहात आणले. आत्महत्या ग्रस्त व कोविड मध्ये आई किंवा वडील वारले असतील अश्या प्रत्येकी 700 मुले सध्या शिक्षण घेत आहेत. आदिवासी माळघाट भागातून 300 मुले आणून त्यांना सुशिक्षित केले. कोविड काळात मुंबई धारावी ते मालेगाव संपूर्ण महराष्ट्रात डॉक्टर आपल्या दारी ह्या योजने अंतर्गत लाखो रुग्णांची तपासणी करून विनामूल्य औषधे वाड्या, वस्त्या व सोसायटीत जाऊन मदत केली,,,5000 बाटल्या रक्ताच्या गोळा करून दिल्या. कोविड टेस्ट तसेच लस्सीकरण करण्यास शासनास सहकार्य तसेच ऑक्सिजन काँसरटेटर मशीन आयात करून विनामूल्य उपलब्ध करून दिली. वरील कंम पाहून महाराष्ट्र शासनाने संस्थेस कोविड योद्धा म्हणून गौरवले व तो पुरस्कार मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे केतनभाई यांनी स्वीकारला.
महाराष्ट्र व इतर राज्यात जिल्हा परिषद शाळे मध्ये मूल्यवर्धन शिक्षण सुरू करून 54000 शिक्षकांना प्रशिक्षित केले,व ज्याची 72 लाख पुस्तके महाराष्ट्र शासन छापून देते.त्याच प्रमाणे स्मार्ट गर्ल अंतर्गत देश भर 8 वी ते 12 वी च्या मुलींना सक्षम करण्याची 2 दिवसीय कार्यशाळा विना मूल्य राबवित आहे,तसेच अँपटिट्यूट टेस्ट,अल्पसंख्याक च्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व राज्य स्तरावरील योजनांचा लाभ घेण्यासाठी देशभर ट्रेनर पाठवून प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.
2015 पासून राज्यात दुष्काळ जन्य भागामध्ये पाणी फौंडेशन तर्फे सुजलाम सुफलाम व नाला खोली करण व सरळी करण करून गाव तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांना तो गाळ विना मूल्य देण्यात येतो. त्या मुळे तलावातील पाणी साठा वाढतो व शेतकऱ्यांची जमीन सुपीक होते. ह्या पाण्याच्या मागील 8 वर्षा पासून करत असलेल्या कामा मुळे कोठेही टँकर द्वारा पाणी पुरवावे लागत नाही व जमिनी खालील पाण्याची पातळी वाढत आहे.भविष्यात त्या मुळे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. वरील काम पाहून नीती आयोग दिल्ली येथून आमच्या संस्थे चे संस्थापक श्री शांतीलालजी मुथा यांना बोलावून देशातील 100 जिल्ह्या मध्ये प्रत्येक जिल्ह्यातील अंदाजे 100 तलावातील गाळ काढण्या करीता नियोजन करण्याचा करार राष्टीय जलसंपदा मंत्री सोबत उदयपूर येथे करार करण्यात आला महाराष्ट्रातील सोलापूर सह 28 जिल्ह्याचा त्यामध्ये सहभाग आहे.
वधुवर परिचय मेळावे,सामूहिक विवाह,घटस्फोटित व उच्च शिक्षिता करीत देशभर मेळावे ई कार्य ही संस्था मागील 35 वर्षा पासून करत आली आहे.केतनभाई शहा हे अनेक सेवाभावी संस्थे च्या वेगवेगळ्या पदावर अनेक वर्षा पासून कार्य करत आले आहेत,,विमानसेवा सुरू व्हावी व सोलापुरात उद्योग येऊन युवकांना रोजगार मिळावा मुले आपलं गाव सोडून जाऊ नये ह्या साठी प्रयत्नशील व धाडसाने लढा देत आहेत.
ह्या संस्थे मध्ये राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची केतनभाई यांना संधी मिळाल्या बद्दल राज्य कार्यकारिणी सदस्य सौ संतोष बंब, विभागीय अध्यक्ष शाम पाटील,सौ सुवर्णा कटारे,जिल्हा अध्यक्ष अभिनंदन विभूते,सौ माया पाटील,ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रवीण बालदोटा,अध्यक्ष देशभूषण वसाळे,सौ प्रविणा सोलंकी,सौ कामिनी गांधी सौ पदमजा पंडित,ई, नि समक्ष भेटून केतनभाई शहा यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या