Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावभुसावळच्या हॉटेल तनारिकासमोर कार थांबवून सोने व सामान चोरणाऱ्या तिघांना अटक

भुसावळच्या हॉटेल तनारिकासमोर कार थांबवून सोने व सामान चोरणाऱ्या तिघांना अटक

भुसावळ/ विशेष प्रतिनिधी – शहरातील हॉटेल तनारिका समोरील नॅशनल हायवेवरील उड्डानपुलावरुन (ता. १५) रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास किशोर रामेश्वर सदावर्ते रा.नागपूर हे त्यांच्या मित्रासह त्यांच्या चारचाकी वाहनाने सुरत येथून नागपुरकडे जात असतांना तीन अज्ञात मोपेड वाहनावरील व्यक्तींनी त्यांना कट मारून त्यांची कार थांबवून त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केले व फिर्यादीच्या मित्राच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन पेंडलसह बळजबरीने हिसकावून घेतले.कारमधील दोन बॅगा घेवून गेले. अशा फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन भुसावळ बाजारपेठ येथे तीन अज्ञात आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील कार थांबवून सोने व दोन बँग चोरणारे तिघे चोरट्यांना अटक करण्यात आली.या गुन्ह्याचे तपासामध्ये तसेच आरोपी निष्पन करण्याच्या दृष्टीने एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव तसेच कृष्णांत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ उपविभाग यांनी दिलेल्या सूचना प्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी तपास अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस उप निरीक्षक मंगेश जाधव तसेच पोलीस स्टेशनला नेमणूकीस असलेल्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश चौधरी, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, तेजस पारीस्कर, पोलीस कर्मचारी प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचिन चौधरी तसेच जावेद शहा अशांना आवश्यकत्या सूचना देवुन गुन्हे शोध पथकाच्या दोन वेगवेगळ्या टीम तयार करुन त्यांना आरोपी शोध कामी रवाना केले होते. गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहीती घेवुन दिनांक 18 ऑगस्ट रोजी गुन्ह्यातील संशयित आरोपी हर्षल संजयकुमार सावकारे वय 27 वर्षे रा. पांडुरंग टॉकीज जवळ, भुसावळ, आनंद प्रकाश पवार वय 20 वर्षे रा. नागसेन कॉलनी, कंडारी, ता. भुसावळ,अनिकेत सदानंद सोनवणे वय 23 वर्षे रा. सराफ बाजार, भुसावळ यांना निष्पन्न करुन त्यांचा दिनांक 22 ऑगस्ट 2023 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे व पोलीस कर्मचारी प्रशांत लाड हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या