Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळमध्ये डीजेचे नुकसान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळमध्ये डीजेचे नुकसान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ शहरातील मातृभूमी चौकातील पंकज कोलते यांच्या मालकीचा डीजे (ता. ७) रोजी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी चेतन उर्फे गोल्या पोपट खडसे राहणार हनुमान नगर आणि गोलू सुलताने राहणार श्रीरामनगर, चमेलीनगर भुसावळ यांनी फिर्यादीचे डी.जे. सिस्टीमचे नुकसान व्हावे व त्रास होण्याच्या उद्देशाने जाळलेले आहेत. आठ लाख रुपयांचे नुकसान म्हणून पंकज अरुण कोलते यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जोशी हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या