Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याभुसावळात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक; अपघातग्रस्त महामार्ग भागाची केली पाहणी

भुसावळात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक; अपघातग्रस्त महामार्ग भागाची केली पाहणी

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यालय, भुसावळ येथे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार सावकारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. विभागांतर्गत विविध विषयावर चर्चा करून प्रश्न मार्गी लावणेबाबत मागणी केली. यावेळी भुसावळ शहरात वांजोळा चौक येथे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे.या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि आमदार यांच्यासह भेट देऊन पाहणी केली. ठिकाणी लवकरात लवकर अंडर बायपास चालू करणे विषयी मागणी केली, तसेच शहरातील नागरिकांना मुख्य महामार्ग न ओलांडता सर्व्हिस रोड वापरण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, भुसावळ मुख्याधिकारी महेश वाघमारे, नायब तहसिलदार श्री.आसटकर, आरटीओ श्री.लोही, एनएचएआय अधिकारी श्री.पवार, भाजपा शहराध्यक्ष परिक्षीत बऱ्हाटे, माजी नगरसेवक अजय नागरानी, सतीश सपकाळे, पिंटू ठाकूर, रविंद्र ढगे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या