Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईममंठा-लोणार रस्त्यावर पत्नीचा कारमध्ये होरपळून मृत्यू; पतीच निघाला मारेकरी; मुलबाळ होत नसल्याने...

मंठा-लोणार रस्त्यावर पत्नीचा कारमध्ये होरपळून मृत्यू; पतीच निघाला मारेकरी; मुलबाळ होत नसल्याने केले कृत्य

जालना/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र राज्यात इतर राज्यांपेक्षा गुन्हेगारीचे प्रमाण कमालीचे वाढले असून गृहमंत्री फडणवीस यांच्या कार्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जालना शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कारच्या एका भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. शेगावला श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेवून परत येत असताना हा भीषण अपघात झाला. पण तपासाअंती पतीनेच पत्नीचा खून केल्याचे उघड झाले आहे. सविता अमोल सोळंके असे जळून मरण पावलेल्या पत्नीचे नाव आहे. तर अमोल गंगाधर सोळंके असे पतीचे नाव आहे.

मंठा लोणार रस्त्यावर गाडी उभी असताना एका पिकअपने कारला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला होता. या अपघातानंतर कारला आग लागली. यामध्ये महिलेचा होरपळून मृत्यू झाला. मृत महिलेचा पती या अपघातातून थोडक्यात बचावला होता. पण पोलिसांनी तपास केल्यानंतर वेगळेच कारण समोर आले आहे. सविता अमोल सोळंके यांना मागील १३ वर्षापासून मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे त्यांचा पती अमोल हा ” घटस्फोट दे ” असे म्हणून सविता सोळंके यांना शिवीगाळ करुन मारहाण करीत होता.हा प्रकार नित्याचाच झाला होता मात्र, त्यांनी घटस्फोट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांने सविता यांना मारायचा कट रचला. त्यानंतर म्हणून कारमध्ये बाहेर नेले. नंतर सविता यांना कारमध्ये टाकून जीवंत जाळले.हा अपघात झाल्याचा बनाव त्याने केला. पण टेम्पोने कारला धडक दिली तर कार डॅमेज कशी झाली नाही ? कार जळत असताना पतीने काचा फोडून पत्नीला का वाचवले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तपास केला असता पतीचा बनाव उघड झाला आहे. तक्रारीवरून पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेतील संशयित आरोपी अमोलला पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल शाम गायके, सुमित होंडे यांनी आरोपीस परतूर तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बलभीम राऊत हे करीत आहेत. दरम्यान या घटनेने जालना शहरात उलट सुलट चर्चेला उत आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या