मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
सोलापूर/ जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापुर ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण शाखे अंतर्गत मंद्रुप पोलीस ठाण्याने दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ ते आजतागायत चोरी,अवैध वाळूवर कारवाई, दारूबंदी,जुगार आदी दाखल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर धडाकेबाज कारवाई केली आहे.
मंद्रूप पोलीस ठाणे येथे मालाविषयी अज्ञात आरोपी विरूध्द चोरीचे २ दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणून १० आरोपींना अटक करून गुन्हयातील चोरीस गेला माल व गुन्हयात वापरलेली वाहने असा एकुण ९ लाख ४४ हजार १८० रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.अवैध वाळूचे २ गुन्हे दाखल करून २ आरोपींवर कारवाई करून दिड ब्रास वाळू व गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण ६ लाख ६५ हजार रूपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच भादवि ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील निष्पन्न वाहनाचा शोध घेववून तपासिक अंमलदारांच्या ताब्यात देवून अज्ञात आरोपीचे नांव देखील निष्पन्न केले.अवैध दारूबंदी कारवाईचे एकूण १५ केसेस दाखल करून १५ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्यात ७०० देशी विदेशी क्वॉर्टर, २५६ लिटर हातभट्टी दारू व गुन्हयात वापरलेली ३ मोटार सायकल असा एकुण १ लाख ४४ हजार ५ रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.अवैध जुगार कारवाईचे एकूण ४ गुन्हे दाखल करून ११ आरोपींवर कारवाई करून रोख रक्कम व जुगार साहीत्य असा एकुण १ लाख ३० हजार ७४० रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.पाहीजे असलेल्या आरोपींमध्ये जत,जि.सांगली येथून मंद्रुप पोलीस ठाणेकडील अभिलेखावरील एकुण ३ आरोपींचा शोध घेवून तपासीक अंमलदारांच्या ताब्यात दिले.तसेच ०२ पाहीजे आरोपी मयत झाल्याने त्यांचे मुत्यु प्रमाणपत्र हस्तगत करून नांव कमी करण्यात आले आहे.२ पाहीजे असीलेल्या आरोपींनी न्यायालयात हजर झाल्याने न्यायालयाच्या आदेशाने त्यांचे नांव कमी करण्यात आले आहेत.सीआरपीसी १२२ ब प्रमाणे २ इसमांवर कारवाई करून ४८ हजार ७१० रूपये किमंतीचा मुददेमाज जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई मंद्रूप पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ एस.बी.काशीद यांच्यासह पोकाॅ.एस.एस.काळे,पोकॉ डी.एम.पवार यांच्या पथकाने केली.