Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मांजरे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण 

मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मांजरे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण 

एका वर्षात बजावली उत्कृष्ठ कामगिरी

सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मंद्रप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांचा मंद्रूप पोलीस ठाणे येथील पदभार घेऊन एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांनी लोकसहभागातून कंदलगाव,तेरामैलते राष्ट्रीय महामार्गावरील रात्रीच्या वाहनांची लुटमारीची घटना घडू नये म्हणून कायमस्वरूपी रेडीयमच्या सहायाने चार भाषांत दोन्ही बाजूंनी सहा लोखंडी सूचना फलक बसवले. शाळा महाविदयालयातील युवक व युवतीना प्रबोधनात्मक व्याख्याने दिली.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोर्‍या,घरफोड्या रोखण्यासाठी मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील सर्व फ्रैबिकेशन व्यवसायिकांची बैठक घेवून दारे,खिडक्या,ग्रिल्स,सेप्टी डोअर बनवण्याची पध्दतीविषयी मार्गदर्शन केले.शेततळ्यात बुडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी शेततळेधारक शेतकऱ्यांची बैठक घेऊन सुरशेबाबत मार्गदर्शन केले.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर वेळोवेळी कारवाई केली.रेकॉर्डवरील पाहिजे असलेले मालमत्ता विषयक गुन्हयातील आरोपींना अटक करून कारवाई केली. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करताना सराईत आरोपींवर वरिष्ठ कार्यालयात पाठलेले तडीपारी बाबत बारा प्रस्ताव पाठवले.वरिष्ठ कार्यालयात पाठवलेले दारुबंदीच्या अनुषंगाने आरोपींवर मुंबई पोलीस अधिनियम अन्वये 36 प्रस्ताव पाठवले.दारुबंदी कारवाई अंतर्गत 199 गुन्हे दाखल,4 लाख 75 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त तर जुगारावरील कारवाईमध्ये 70 गुन्हे दाखल,21 लाख 86 हजार 098 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून गुटख्यावरील कारवाईत 7 गुन्हे दाखल तर 1 कोटी 3 लाख 33 हजार 391 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाबितीमध्ये जिल्ह्यात अव्वल क्रमांक प्राप्त तर सोलापूर ग्रामीण घटकात सर्वोत्कृष्ठ पोलीस स्टेशन म्हणून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. पोलीस पाटलांना ड्रेस कोड लागू लागू करण्यात आला. विविध गुन्ह्यातील 20 लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर परीक्षेतील कालावधी पूर्ण झाल्याने नियमानुसार पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई यांनी सोलापूर शहर येथे त्यांची नेमणूक केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या