Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामध्य-उत्तर महाराष्ट्रात पुढील ४८तासांत मान्सून सरकणार..

मध्य-उत्तर महाराष्ट्रात पुढील ४८तासांत मान्सून सरकणार..

नाशिक/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नाशिकसह शेजारच्या जिल्ह्यात प्रखर उन्हाच्या झळा अनुभवयास येत आहेत. त्याचप्रमाणें धुळे व जळगाव येथेही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना उष्णतेचा दाह सोसावा लागत आहे. कमाल तापमानात मागील तीन दिवसांपासून वाढ होत असून उन्हाच्या तीव्रतेचा चटका जाणवत असताना येत्या सोमवारपर्यंत (दि.१३) हवामान खात्याकडून नाशिककरिता ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आज व उद्या वीजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह वादळी पाऊस जिल्ह्यात होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नैऋुत्य मान्सूनची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. पुढील ४८ तासांत मान्सून राज्याच्या काही भागात आणखी सरकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. दुसरीकडे अरबी समुद्रात उठलेले ‘बिपरजॉय’नावाच्या चक्रीवादळाने हवामानाची स्थिती अधिक बिघडविली आहे. मध्य व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत गारपीटीचीही शक्यता या तीन दिवसांत वर्तविण्यात आली आहे. रविवारपासून तर गुरुवारपर्यन्त  (दि.१३) आणि ( दि.१४ नाशिक,जळगावमध्ये मान्सुनपूर्व पाऊस पुन्हा एकदा जोरदार वादळी स्वरुपात हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे या तीन दिवसांत नागरिकांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या