Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमममुराबाद वीटभट्टी व्यावसायिकाची आत्महत्या

ममुराबाद वीटभट्टी व्यावसायिकाची आत्महत्या

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील वीटभट्टी व्यावसायिकाने त्याच्या १० वर्षीय मुलासमोरच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुःखदायक घटना घडली आहे. तब्बल पाच ते सहा तासांनी त्याचा मृतदेह मिळाला.तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान भास्कर कुंभार (वय ३८, रा.पटेल वाडा ममुराबाद ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो गावात वीट भट्टीचा व्यवसाय करतो. जळगावात समाधान हे १० वर्षीय मुलगा वैभव याच्यासह विटांचे ट्रॅक्टर खाली करायला आला होता. तेथील काम पूर्ण झाल्यावर ते परत ममुराबाद येथे घरी निघाले. गावात आल्यावर म्हाळसादेवी मंदिरजवळ समाधान कुंभार यांनी ट्रॅक्टर थांबविले. मुलाला ट्रॅक्टरवर बसवून, ‘आला मी…’ म्हणत समाधान याने जवळच्या विहिरीजवळ जाऊन त्यात थेट उडी घेतली. या घटनेने भांबावलेल्या चिमुरड्या वैभवला काहीच समजले नाही. काही वेळाने त्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांना सांगितले. त्यांनी तातडीने गावातल्या लोकांना बोलावून पोलिसांना फोन केला. गावातील पट्टीच्या पोहणाऱ्या मुलांनी सहा तासांनी समाधानचा मृतदेह बाहेर काढला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. तेथे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मयत समाधान कुंभार यांचे पश्चात पत्नी ज्योती, मुलगी राणी, मुलगा वैभव असा परिवार आहे. ममुराबाद गावात हळहळ व्यक्त केली जात असून तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या