Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedमलकापूरनजीक दोन लक्झरींची जोरदार टक्कर: 7 प्रवासी ठार; परिसर सुन्न

मलकापूरनजीक दोन लक्झरींची जोरदार टक्कर: 7 प्रवासी ठार; परिसर सुन्न

मलकापूर/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मलकापूर शहरात नॅशनल हायवे क्रमांक सहावर असलेल्या उड्डाण पुलावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या दोन लक्झरी बस एकमेकांवर जोरदार आदळल्या. या अपघातामध्ये एकूण सात प्रवासी ठार झाले आहेत. 25 ते 30 प्रवासी काही गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन्ही बसमध्ये टक्कर झाली. यातील एक लक्झरी बस (एमएच 08-9458) रॉयल कंपनीची आहे तर दुसरी बस यात्रेकरूंची होती. अमरनाथ यात्रा संपवून ही लक्झरी बस (एमएच 27 बिएक्स 4466) हिंगोलीच्या दिशेने जात होती. तर रॉयल कंपनीची बस नागपूरकडून नाशिकच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर दोन्ही बस समोरील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. तीर्थयात्रींच्या बसमधील ड्रायव्हर सुद्धा या अपघातात ठार झाला आहे. घटनास्थळी एकूण 5 प्रवासी गतप्राण झालेत तर 2 प्रवासी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा या ठिकाणी आणल्यानंतर दगावले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या