जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथील तलाठी रुपेश अनिल ठाकूर यांचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत ” उत्कृष्ट तलाठी ” म्हणून जाहीररित्या सन्मान करण्यात आला.उत्कृष्ट तलाठी म्हणून त्यांनी सन 2022 व 2023 या कार्यकाळात महसूल विभागात वाखाणण्याजोगे कार्य केले आहे.त्या कार्याचा गौरव म्हणून रुपेश ठाकूर यांचा महसूल दिनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलिस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या उपस्थितीत, उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर व जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जनतेची कामे जलतगतीने करण्यात श्री.ठाकूर यांची परिसरात ओळख आहे. त्यांचे पोलीस दक्षता लाईव्हचे मुख्य संपादक चंदन पाटील, कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे यांनी पोलीस दक्षता लाईव्ह टीमच्यावतीने विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.