Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावमहापुरुषांच्या पुतळ्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही व संरक्षण भिंत उभारण्याची मागणी

महापुरुषांच्या पुतळ्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही व संरक्षण भिंत उभारण्याची मागणी

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- शहरात आणि जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी थोर महापुरुषांचे पुतळे आहेत, त्या त्या ठिकाणी सुरक्षा म्हणून प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरे, कुंपणाची भिंत, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत बसविण्यात यावेत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पार्टीच्यावतीने करण्यात आली. पार्टीतर्फे या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोमवार, २६ जून रोजी देण्यात आले. निवेदनाचा आशय असा- जळगाव शहरातील समतानगर भागात काही महिन्यांपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला. अशा घटना वारंवार घडल्या आहेत. अनेकवेळा महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झाली आहे. समाजात गैरसमज करण्याचा प्रयत्न होत असतो. अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हा क्षेत्रमख पराग कोचुरे, युवक जिल्हाध्यक्ष दिनेश कोळी, जळगाव शहराध्यक्ष प्रवीण पाटील, नरेंद्र सपकाळे, चंदूभाऊ श्रावणे, अनिल भावसार, जतीन पांड्या, युसू खान, राज पाटील, परवेज शाह, विकी पाटील आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या