Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावमहामानव डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

महामानव डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव/ कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त जळगाव शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मंडळांचा यात उत्स्फूर्त सहभाग होता.,रात्री जवळपास एक वाजेपर्यंत विविध आकर्षक देखाव्यासह मिरवणूक पुढे पुढे जात होती.

महापालिकेचे प्रवेशद्वार ते टॉवर चौकात विविध पक्ष आणि सामाजिक संघटनेच्यावतीने स्टेज उभारण्यात आले होते.. मिरवणुकीतील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मोमेंटो ,सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला जात होता..मिरवणुकीत पारंपरिक गोफ ,लेझीम पथक शिस्तबद्धपणे खेळण्यात दंग झालेले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो….आणि जय भीमचा नारा तसेच ढोल-ताशांच्या ,डिजेच्या निनादात तरुणाई नृत्याच्या तालावर थिरकत होती,पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता..शोभायात्रेत विविध मनोहारी देखावे सादर करण्यात आले होते, ते आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले .
दोन स्टेजवर भीम गीतांचा कार्यक्रम चांगलाच रंगतदार ठरला..यात प्रसिद्ध कलावंत तुषार वाघुळदे,लक्ष्मी नाटेकर ,कपिलकुमार ,आशिष तायडे आदींनी सहभाग घेतला ,त्यांनी सहा तास धम्माल केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. भीमसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह आणि जल्लोष याप्रसंगी पाहायला मिळाला. मुख्य मार्गावरील रस्ते हजारो भीमसैनिकांनी भरलेले दिसून येत होते. शोभायात्रेत विविध देखावे सादर करण्यात आले असून ते आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या