Sunday, July 13, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedमहाराष्ट्र चेंबरतर्फे सोलापूरहून विविध ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याची मागणी

महाराष्ट्र चेंबरतर्फे सोलापूरहून विविध ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याची मागणी

सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी/खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- देशातील इतर प्रमुख शहरास सोलापूर हे हवाई मार्गाने जोडले गेले पाहिजे ही मागणी जोर धरू लागली आहे. स्टार एरलाईन्सचे चेअरमन संजय घोडावत यांना सोलापूर विमानतळावरील अडथळे दूर झाले. लवकरच डीजीसीए पाहणी करून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यास परवानगी देत आहे, त्यामुळे स्टार ऐअरलाईनतर्फे सोलापुरातून मुंबई, तिरुपती, दिल्ली,जयपूर व चेन्नई या ठिकाणी विमानसेवा सुरू करावी बेंगलोर आणि हैदराबादसाठी स्पाईस जेट व अल्लाईन्स कंपनीला या अगोदरच उड्डाण योजने अंतर्गत परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व विकास मंच तर्फे निवेदन अध्यक्ष ललीत गांधी सोबत केतनभाई शहा, व इतर पदाधिकारी होते. ह्या बैठकीच्या वेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी सोबत देखील फोनवर संभाषण केतनभाई यांनी करून दिले. खासदार यांनी सुद्धा त्यांना विमानसेवा सुरू करण्या बाबत विनंती केली आहे. ह्या मागणीला उत्तर देताना संजय घोडावत म्हणाले,माझे अजून 2 नवीन विमाने 80 आसनी येत आहेत. बेस बेंगलोर व बेळगावी असून तेथून वाया सोलापूर कशी विमानसेवा सुरू करता येईल ते मी आमच्या टीमशी चर्चा करून पाहतो व मुंबईला स्लॉट कसा मिळतो ते बघतो,उड्डाण 5 योजनेत सोलापूरचे नाव आहे असे त्यांनी सांगितले. 50% तिकीट सवलतीचा फायदा सोलापूरकराना मिळाला पाहिजे. जरूर मिळेल व मी स्वतः पायलट आहे. ट्रेनिंगसाठी मी बरेच वेळा सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावर माझे विमान उतरवले आहे असे सांगितले.

जयसिंगपूर येथील युनिव्हर्सिटीमधील त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये 2 तास बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली व राज्यातील इतर गावात देखील आपल्या स्टार ऐरलाईन्सतर्फे सेवा सुरू करण्याची मागणी चे पत्र देण्यात आले,ह्या वेळी केतनभाई यांनी त्यांना विनंती केली, आपले अनेक उद्योग जयसिंगपूर परिसरात आहेत. एखादं दुसरा उद्योग सोलापुरात आणावा अशी विनंती केली असता हो आम्ही एक ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे व इतर उद्योग कसा आणता येईल ते पाहतो असे सांगण्यात आले.
ह्या बैठकीस स्टार एअरलाईन्सचे चेअरमन संजय घोडावत, चेंबरचे अध्यक्ष ललीत गांधी,विकास मंचचे शाह,सोबत नाशिक, जळगाव,संभाजीनगर, पुणे येथील सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या