Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज लायब्ररी असोसिएशन (मुक्ला) पंचवार्षिकसाठी केंद्रीय कार्यकारिणीची निवड

महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज लायब्ररी असोसिएशन (मुक्ला) पंचवार्षिकसाठी केंद्रीय कार्यकारिणीची निवड

अमरावती/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमरावती येथे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज लायब्ररी असोसिएशन (मुक्ला) ची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. सभेमध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या सेक्शनल कौन्सिलमधून निवडून आलेल्या सभासदांनमधून २०२३-२८ या पंचवार्षिकसाठी केंद्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदासाठी डॉ. मोहन खेरडे यांची सर्व सभासदांमधून आधीच निवड करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय कार्यकारणीचे उपाध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नॉलेज रिसोर्स सेंटरचे डायरेक्टर डॉ.धर्मवीर वीर यांची निवड करण्यात आली. जनरल सेक्रेटरी म्हणून एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ सेक्शनल कौन्सिलचे जळगाव येथील महिला महाविद्यालयाचे डॉ. विनय पाटील यांची निवड करण्यात आली. सहसचिव म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नॉलेज रिसोर्स सेंटरचे डायरेक्ट डॉ.जगदीश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्ष म्हणून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यापीठ सेक्शनल कौन्सिलचे धनाजी नाना महाविद्यालय जळगावचे सुनील पाटील यांची निवड करण्यात आली. या सोबतच विविध विद्यापीठांमधील खालील प्रतिनिधींची केंद्रीय कार्यकारी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. यात मुंबई साठी डॉ.सुभाष चव्हाण, डॉ.नंदकिशोर मोतेवार, डॉ.महेश एम दळवी, प्राजक्ता प्रदीप म्हाप्रोळकर,डॉ.संदेश डोंगरे, औरंगाबाद साठी डॉ.शिवशंकर घुमरे, डॉ.गोवर्धन औटे, नांदेड साठी डॉ.अनिल जाधव, पुणे साठी डॉ.संजय देसले, डॉ.संभाजी पाटील, कोल्हापूरसाठी डॉ.धनंजय सुतार, जळगावसाठी शिरीष झोपे, सोलापूरसाठी डॉ.वंदना गवळी, नागपूर साठी डॉ.धनंजय देवते,डॉ. सुनील नरनवरे,गडचिरोली साठी डॉ.सुधीर अस्तुनकर,अमरावती साठी डॉ.प्रशांत देशमुख, डॉ.रविकांत महिंदकर, डॉ.मिलिंद अनासणे या सर्वांचे याप्रसंगी कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या