Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामहावितरणची चांदवडला वीज चोरांवर धडक कारवाई

महावितरणची चांदवडला वीज चोरांवर धडक कारवाई

चांदवड/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- चांदवड तालुक्यातील वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरण , चांदवड मार्फत वीज चोरीला आळा लावणे कामी धडक मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमे अंतर्गत वेगवेगळ्या भरारी पथकांमार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे. दिनांक २९ मे रोजी नाशिक ग्रामीण येथील भरारी पथक यांनी चांदवड शहरी भागात धडक कार्यवाही करून रक्कम ६०,०००/- या प्रमाणे दंडात्मक कार्यवाही केलेली आहे. तसेच दिनांक ३० मे रोजी भरारी पथक ,धुळे यांनी चांदवड शहरी भागात धडक कार्यवाही करून रक्कम ५०,००००/- (पाच लाख रु)या प्रमाणे दंडात्मक कार्यवाही केलेली आहे.

चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी यांच्या मार्गदर्शन अंतर्गत आणि चांदवड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील यांच्या नेतृत्वात उपविभागातील कर्मचारी आणि कक्ष अभियंता गौरव गायकवाड यांसह कक्ष कर्मचारी यांनी दिनांक ९ जून रोजी एकूण १० ते १२ ठिकाणी धडक कार्यवाही करून रक्कम अंदाजे ७०,०००/- ते ८०,०००/- पर्यंत या प्रमाणे दंडात्मक कार्यवाही केलेली आहे. पूर्ण महिन्याभरात चांदवड उपविभागातील १२ कक्ष कार्यालयामार्फत ३० ते ४० ठिकाणी वीज चोरी पकडण्यात आलेली आहे. सदर ग्राहकांकडून दंडात्मक रक्कम वसूल करणे कामी कार्यवाही सुरु आहे.तसेच पुढेही वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरण,चांदवड मार्फत वीज चोरीला प्रतिबंध करणे कामी कार्यवाही सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या