Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeक्राईममहिलेची पर्स चोरणाऱ्या महिलांना पकडले; गुन्हा दाखल

महिलेची पर्स चोरणाऱ्या महिलांना पकडले; गुन्हा दाखल

चाळीसगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- चाळीसगाव तालुक्यातील खरजई नाका भडगाव रोडजवळ बसमधील प्रवाशी महिलेची पर्स जबरी हिसकावून पळ काढणाऱ्या तीन महिलांना नागरिकांच्या मदतीने रंगेहात पकडले आहे. तिघांना चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा समाधान चौधरी (वय २८) रा. मालेगाव, जि. नाशिक या महिला १७ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास चाळीसगाव भडगाव बसमधून प्रवास – करीत होत्या. बसमधे असतांना एका महिला चोराने आशा चौधरी यांच्या हातातील पर्स हिसकावून बसमधून उतरत पळत सुटली. तिच्या सोबत इतर दोन महिला देखील होत्या. पर्स लांबविल्यानंतर आशा चौधरी यांनी आरडाओरड केली. तेव्हा नागरीकांनी तिघा महिला चोरांचा पाठलाग करून पकडले व चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी तिघांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या