Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedमहिलेने रेल्वेसमोर उडी घेऊन संपवली जीवनयात्रा; मूर्तिजापूरातील घटना

महिलेने रेल्वेसमोर उडी घेऊन संपवली जीवनयात्रा; मूर्तिजापूरातील घटना

अकोला/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका ३० वर्षीय विवाहित महिलेने रेल्वेसमोर उडी घेत आपले आयुष्य संपवले आहे. विवाहित महिलांच्या आत्महत्या प्रकरणात अलीकडे खूपच वाढ झाली आहे. काजल कांबे असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काजल कांबे स्वतःची स्कूटर घेवून चिखली गेट परिसरातील रेल्वे ट्रॅकवर गेल्या. पुणे -अमरावती सुपर फास्ट रेल्वे येताच काजलने रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वे चालकाच्या लक्षात येतात गाडीचे ब्रेक लावण्यात आले. मात्र, तोपर्यंत गाडी काजलच्या शरीरावरून गेली होती. तिने जीवनयात्रा संपवली होती. रेल्वे रुळाजवळ त्यांची देखील पर्स आढळून आली.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पण या ठिकाणी येण्याआधी त्या रेल्वे इंजिनजवळ गेल्या होत्या.पण तिथे  त्यांना हटकण्यात आल्यामुळे त्या तिथून रेल्वे ट्रॅककडे गेल्या होत्या. काजलचे लग्न सहा वर्षांपूर्वी संकेत कांबे बरोबर झाले होते. प्रतिष्ठित डॉक्टर राजेश कांबे यांच्या काजल सुन होत्या. त्यांना दोन मुले देखील आहेत. पण काजलच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या