Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईममहिलेला अश्लील शिवीगाळ करून,कपडे फाडून मारहाण; गुन्हा दाखल

महिलेला अश्लील शिवीगाळ करून,कपडे फाडून मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात काही न काही गुन्हे सध्या घडतच आहेत. शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १८ मे रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला अश्लिल शिवीगाळ करून,विनयभंग करून मारहाण करण्यात आलीआहे.

जिल्हापेठ पोलिसांनी या घटनेबाबत दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० वर्षीय महिला वास्तव्याला आहे. १८ मे रोजी ही महिला आपल्या परिवारासह सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घरी असतांना मनोज लिलाधर वाणी याने घरासमोर येवून काहीही कारण नसतांना महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच तिच्या कालशिलात लावून अंगावरील कपडे फाडून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी मनोज वाणी याच्या विरोधात दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक भारती देशमुख करीत आहेत. दरम्यान या घडलेल्या घटनेची चर्चा गोटागोटात रंगली होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या