जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव राष्ट्रीय महामार्गालगत मास्टर कॉलनीतील बॉम्बे बेकरीजवळ रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावून चोरट्यांनी पळ काढला.मांजरली (ता. कल्याण) येथील मुळ रहिवासी यशवंत विठ्ठल भगत (वय ३०) नोकरीनिमित्त जळगावात आले होते. साडे अकराच्या सुमारास यशवंत भगत रिलायन्स पेट्रोलपंपाकडून बॉम्बे बेकरीकडे जात असताना, दुचाकी (एमएच १९, ईबी ९०५) वरून आलेल्या चार तरुणांनी त्यांना थांबवून त्यांच्या शर्टाच्या खिशातून मोबाईल हिसकवला आणि दमदाटी करून पिटाळून लावले.यशवंत भगत यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत चौघांविरुद्ध जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे,पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे पुढील तपास करीत आहेत.