पुणे/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- तळेगाव औद्योगिक वसाहत पोलीस ठाणेच्या हद्दीत एक्सरबीया सोसायटी, एमआयडीसी रोड, आंबी येथे मराठी सिने अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी (वय 77 वर्षे) हे बंद फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत मिळून आले आहेत.ते गेले 7- 8 महिन्यापासून वरील ठिकाणी एकटेच राहण्यास होते. त्यांचा मृत्यू 2-3 दिवसांपूर्वी झालेला असावा. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा गश्मिर यांना कळविण्यात आली आहे, ते उद्या तळेगाव येथे आल्यानंतर मृतदेहाचे पोस्ट मोर्टेम करण्यात येणार आहे. मराठीतील एव्हरग्रीन हीरो म्हणून परिचित असणारे महाजनी यांनी अनेक मराठी चित्रपट गाजवले. ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे अनेक यशस्वी चित्रपट महाजनी यांनी केले.
मुंबईचा फौजदार फेम प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी आढळले मृतावस्थेत
RELATED ARTICLES

