Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावमुंबईच्या केईएममधील निवासी डॉ.आदिनाथ पाटील यांची आत्महत्या

मुंबईच्या केईएममधील निवासी डॉ.आदिनाथ पाटील यांची आत्महत्या

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई येथील केईएम रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केईएममधील निवासी डॉ.आदिनाथ पाटील यांनी शिवडी येथील टी.बी रुग्णालयात आत्महत्या केली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर भोईवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.केईएम रुग्णालयात दुरूस्ती सुरू असल्याने मेडिसीन विभाग टी.बी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेने रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे जळगावचे आदिनाथ पाटील (२७) हे के.ई.एम रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. ते मेडिसिन विभागात पहिल्या वर्षात पदव्युत्तर शिक्षण घेत होते. आदिनाथ पाटील यांनी टी.बी रुग्णालयात रात्रीच्या वेळेस इंजेक्शन घेत आयुष्य संपवलं आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मात्र त्यांनी असे पाऊल का उचललं, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. याचा शोध पोलीस घेत आहे.दरम्यान शिवडी रुग्णालयात सोयीसुविधा अभाव असल्याने अनेक निवासी डॉक्टरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे डॉक्टर नैराश्यात जाऊन अशा घटना घडत आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाने गांर्भीयाने लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान या घटनेचा तपास पोलीस बारकाईने करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या