मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
मुंबई/कार्यकारी संपादक/ तुषार वाघुळदे / पोलीस दाखता लाईव्ह:- मुंबई या मायानगरीत पुन्हा सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे.सेक्स रॅकेट प्रकरणी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शक आरती मित्तल हिला सोमवारी (१७ एप्रिल) पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई क्राइम ब्रांच युनिटने ही धडक कारवाई केली आहे.
मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी मनोज सुतार यांना या सेक्स रॅकेटबद्दल गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहकांना हॉटेलवर पाठवत हे प्रकरण उघडकीस आणले आहे. त्यांनी आरती मित्तलकडे दोन मुलींची मागणी केली. यासाठी ६० हजार रुपये आरतीने मागितले होते. त्यानंतर आरती मित्तलला दोन मुलींना घेऊन हॉटेलवर बोलविण्यात आले होते. यामध्ये सामील होण्यासाठी आरतीने अधिक पैशांची मागणीही केली होती. आरती हॉटेलवर येताच पोलिसांनी तिला अटक केली. आरती मित्तल सेक्स रॅकेट प्रकरणात दोन देखण्या मॉडेल्सची गोरेगाव येथून सुटका करण्यात आली आहे. या मॉडेल्सला आरती मित्तल १५ हजार रुपये देणार होती, असा खुलासा त्यांनी केला आहे.
आरती मित्तल कास्टिंग दिग्दर्शक व अभिनेत्री आहे. ‘अपनापन’ या मालिकेत ती झळकली होती. काही दिवसांपूर्वीच आरतीने बॉलिवूड अभिनेता आर. माधवनसह चित्रपटाचे शूटिंग करत असल्याची पोस्ट केली होती. यापूर्वीही अनेकदा बॉलीवूड मध्ये विविध प्रकारचे सेक्स रॅकेट उघडकीस आल्याच्या घटना घडल्या असून अनेकांना अटक करून शिक्षाही झाली आहे ,पुन्हा अशा घटनेने डोके वर काढलेले दिसून येत आहे.
अजून मुंबई परिसरात सेक्स रॅकेट तर कार्यरत तर नाही ना ? याचा मुंबई क्राईम ब्रँचने कसून चौकशी सुरु केली आहे.