Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यकुशलतेबद्दल भाजप नाराज; अचानक राजीनामा द्यावा लागणार? राजकीय घडामोडींना वेग...!

मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यकुशलतेबद्दल भाजप नाराज; अचानक राजीनामा द्यावा लागणार? राजकीय घडामोडींना वेग…!

मुंबई/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस अचानक सुटीवर गेल्याने राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू असून राजकिय गोटात विविध तर्कवितर्क लढविले जात आहे,दरम्यान ” मी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील दरे गावात आहे. शेत शिवारात आहे, आराम करण्यासाठी आलो आहे..तेथील तपोला पुलाचे निरीक्षण केले आणि तपोला -महाबळेश्वर रस्त्याचे भूमिपूजन केले ” असे त्यांनी सांगितले आहे.अचानक दिल्लीहून सूचना येईल आणि राजीनामा द्यावा लागेल असे भाकीत आहे.भारतीय जनता पक्ष हा शिंदे यांच्या कार्य कुशलतेबद्दल कमालीचा नाराज आहे असे बोलले जात आहे.

अजित पवार हे 52 आमदार घेऊन भाजपात स्वतंत्र गट तयार करतात का ? याकडे लक्ष लागले आहे. राजकीय वातावरण तापले असून मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो,सरकार कोसळूही शकते असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. नवीन मुख्यमंत्री अजित पवार होतात की अन्य कोण ? याबद्दल ची चर्चा चांगलीच रंगली आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकरच येणार आणि शिंदे- फडणवीस सरकार कोसळणार इतकंच नाही तर अजित पवार भाजप सोबत येतील आणि मुख्यमंत्री होतील अशा देखील चर्चा सुरू आहेत.

मुख्यमंत्री अचानक गावाकडे का गेलेत ? या मागचे रहस्य काय असेल,याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. त्यातच दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेसंदर्भात फारसे समाधानकारक नसल्याचे देखील बोललं जात आहे. दिल्लीत महाराष्ट्राच्या सत्तेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे ,हे ही तितकेच खरे आहे.तसेच आमदार अपात्रतेचा निर्णय आल्यास राजीनामा तयार ठेवा असं शिंदेंना दिल्लीतून सांगितलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याची जोरात चर्चा आहे. शिंदे भाजपला नकोसे झाले असल्याचे देखील बोललं जात आहे.येत्या दोन दिवसात दिल्ली हायकमांड अजून काय निर्णय घेते याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बघूया पुढे काय होते ते ,पण राज्यातील सत्तेत मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधकांकडून तर मुख्यमंत्री नाराज असल्याचा दावा केला जातोय. राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा रंगली असताना राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. भाजपच्या हालचालींना शिंदे गटांन सूचक इशारा दिला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले तेव्हा त्यांच्या अपेक्षा अशा होत्या की एक मराठा नेता आपल्यासोबत येत आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातलं राष्ट्रवादी काँग्रेसचं केडर तोडून ते तिथे भाजपला मदत करतील अशी डील झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र एकनाथ शिंदे ठाणे आणि पालघर याच्या पलिकडे जाऊ शकलेले नाही असे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर नाराजी असल्याचे बोललं जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या