Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामुलाच्या लग्नासाठी काढली सुटी, एपीआय शिंदेंचा हृदयविकाराने मृत्यू

मुलाच्या लग्नासाठी काढली सुटी, एपीआय शिंदेंचा हृदयविकाराने मृत्यू

पुणे/विशेष प्रतिनिधी/,पोलीस दक्षता लाईव्ह:- सध्या लग्नाचा धुमधडाका सुरू आहे.मुलाच्या लग्नासाठी गेल्या काही दिवसांपासुन हक्क रजेवर असणार्‍या पुणे ग्रामीण पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

एपीआय भालचंद्र शिंदे हे पुणे ग्रामीण पोलिस दलातील पौड पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी हक्क रजा घेतली होती. मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेचे वाटप करत असतानाच त्यांना त्रास होऊ लागला म्हणून त्यांना उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.
शिंदे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे शिंदे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.अनेक प्रतिष्ठित मंडळींनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या