मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
बुलडाणा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भारतीय माजी रणजी क्रिकेटपटूच्या पत्नीचं निधन झाले आहे, तर क्रिकेटपटू जखमी झाला आहे.हा अपघात झाला तेव्हा बघ्यांची गर्दी झाली होती.
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचं निधन झालं आहे.माजी क्रिकेटपटू प्रविण हिंगणीकर यांच्या पत्नी सुवर्णा यांचा या अपघातात मृत्यू झाला. मेहकर जवळच्या लासुरा फाट्याजवळ क्रेटा गाडी उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन धडकली. या अपघातात हिंगणीकर यांच्या पत्नीचं निधन झालं तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला मेहकरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.