Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावमेहरूणच्या संस्कृती विद्यालयाच्या वारकरी दिंडीने लक्ष वेधले...!

मेहरूणच्या संस्कृती विद्यालयाच्या वारकरी दिंडीने लक्ष वेधले…!

जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- संस्कृती माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्ती पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका येवले तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. परिसरात दिंडी काढत असताना मेहरूण परिसर विठ्ठल नामांच्या घोषणांनी दणाणून गेला. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी तसेच पालकांनीही मृदुंगावर ठेका घेतला,त्यानंतर आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्या बालकांनी विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ,संत गोरा कुंभार ,संत मुक्ताबाई यांची वेशभूषा परिधान केलेली होती. कल्पेश विसपुते याने विठुरायाची दीक्षा सपकाळे हिने रखुमाईची भूमिका साकारली. मुख्याध्यापकांच्या हस्ते बालकांना तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या