Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईममोटारसायकल येऊन मागून पाठीवर चाकू खुपसला; थोरगव्हाण रस्त्यावरील घटना

मोटारसायकल येऊन मागून पाठीवर चाकू खुपसला; थोरगव्हाण रस्त्यावरील घटना

सावदा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  चाकू हल्ला, घरफोडी आणि खुनाच्या घटनेत जिल्ह्यात वाढ झाली असून पोलीस यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सावदा येथील तरुण थोरगव्हाण येथून सावद्याकडे दुचाकीने येत होता. या दुचाकीस्वारावर थोरगव्हाण सावदा रोडवर अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. याप्रकरणी सोमवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.

सावदा येथील रजानगरातील रहिवासी तरुण जुलैच्या रात्री ७.४५ ते ८ वाजेदरम्यान दुचाकीने थोरगव्हाण येथून सावदाकडे येत होता. यावेळी दोन अनोळखी अर्शद वाजिद खाटीक याचे मागून काळ्या रंगाच्या दुचाकीने आले. त्यापैकी दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने हातातील चाकूने अर्शद वाजीद खाटीक याच्या पाठीवर वार करून दुखापत केली. तक्रारदाराला पैसे मागून त्याचा मोबाइल हातातून हिसकावून पळून गेले. याप्रकरणी सोमवारी दुपारी दोघांवर गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करत आहे. अरशद खाटीक यांचेवर जळगाव येथे उपचार सुरू आहे. दरम्यान, दुचाकीस्वार तरुणावर हल्ला करणारे कोण होते ? त्यांचा उद्देश काय? याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.पोलिसांनी कसून शोध घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या