मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
सोलापूर/ जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह:- मोहोळ ( जि.सोलापूर )- औसा व लातूर परिसरात चोरलेल्या मोटरसायकली माढा तालुक्यात विक्री करणारी टोळी मोहोळ पोलिसांनी पकडली आहे. त्यांच्याकडून विविध कंपनीच्या १६ लाख २० हजाराच्या २४ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत .या प्रकरणी दोघां विरोध गुन्हा दाखल केला आहे .
पवनराज गुलाब चव्हाण रा.तावशी ता.औसा जि.लातूर ह्याने औसा, लातूर, सोलापूर, मोहोळ, बीड, आंबेजोगाई, पुणे, पंढरपूर, इंदापूर, कर्नाटक या परिसरातील २४ मोटरसायकली चोरी करून त्या खुदबुददीन आमिन सय्यद रा.धानोरे, ता.माढा यांच्याकडे नंबर प्लेट बदलून फायनान्सची गाडी आहे असे सांगून विक्रीसाठी देत होता .
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीश सरदेशपांडे, अप्पर पोलीस अघिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने, अमोल घोळवे, प्रवीण साठे, सिद्धनाथ मोरे, सायबर क्राईमचे धीरज काकडे यांनी केली. पुढील तपास पोलीस करत आहे.