भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले आहेत, या निमित्ताने देशभरात भाजपामार्फत मोदी “महा संपर्क अभियान” सुरू आहे. या अनुषंगाने आज भाजपा भुसावळ तर्फे “भव्य बाईक रॅली” कार्यक्रमाचे रावेर लोकसभा क्षेत्रातील भुसावळ येथे आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले.या रॅलीत खासदार रक्षा खडसे ,भाजपा भुसावळ तालुका पदाधिकाऱ्यांसह नाहाटा चौक येथून “भव्य बाईक रॅली” सुरवात करून रेल्वे लोखंडी पूल खालून, गांधी स्मारक, मामाजी टॉकीज मार्गे जामनेर रोड नवशक्ती ऑर्केड येथे बाईक रॅलीची समाप्ती होऊन, उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापाणी व अल्पोहार करण्यात आला. यावेळी आमदार संजय सावकारे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे,भाजयुमो शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी व असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.