Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना अखेर न्यायालयाचा दिलासा

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना अखेर न्यायालयाचा दिलासा

सोलापूर/ क्राईम रिपोर्टर खंडेराव पाटील प. महा./ पोलीस दक्षता लाईव्ह:- कर्जदारास गाडी न देता दुसऱ्यास गाडी देऊन महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यास जिल्हा व सत्र न्यायाधीश आर्.एन. पांढरे यांनी जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, महामंडळाचे व्यवस्थापक म्हणून बापूराव नेटके हे कार्यरत असताना दिनांक 25 /11/2014 रोजी कर्जदार सुनील सुभाष चव्हाण यास कर्ज मंजूर झाले असताना कायजन ऑटो कोर्स प्रायव्हेट लिमिटेड. सोलापूर यांनी त्यास वाहन वितरित न करता सुनील बळवंत बचुटे यांच्याकडून 11 लाख 75 हजार 500 रुपयाचा धनादेश घेऊन वाहन वितरित करून महामंडळाची 11 लाख 75 हजार 500 रुपये ची संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मण अभिमन्यू शिरसागर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तपासामध्ये रमेश कदम यांचा सहभाग असल्याने त्यांना दि. १३ डिसेंबर २०१६ रोजी अटक केली होती . तेव्हापासून रमेश कदम हे कोठडीत होते. हा खटला न्यायालयात प्रलंबित होता .त्यामुळे माजी आमदार रमेश कदम यांनी अँड. मिलिंद थोबडे यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अर्ज दाखल केला होता .
अर्जाच्या सुनामीच्या वेळेस अँड. मिलिंद थोबडे यांनी आपल्या व्यक्तीवादात आरोपी हा गेली सहा वर्ष सात महिन्यापासून कोठडीत असून खटला अद्याप सुरू झालेला नाही .अशा परिस्थितीत अर्जदार आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचा आदेश व्हावेत.त्या पृष्ठयार्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. ते ग्राह्य धरून न्यायालयाने 50,000 हजार रुपयांच्या जातमुचुलक्यावर जामीन मंजूर केला. या निकालामुळे माजी आमदार रमेश कदम यांचा कोठडीतून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला. यात अर्जदार आरोपीतर्फे अँड. मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर सरकार तर्फे अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या