Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यायावलच्या महालक्ष्मी पतसंस्थेच्या अवसायकास लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

यावलच्या महालक्ष्मी पतसंस्थेच्या अवसायकास लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

यावल/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नगर परिषद सावदा जि. जळगाव येथील व्यापारी संकुलातील श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा आणि गाळ्याची संबंधित अनामत रक्कम तक्रारदार यांचे नावे वर्ग करून देण्यासाठी यावल येथील महालक्ष्मी पतसंस्थेचे अवसायिक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष ५,००,०००/- (पाच लाख) रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम ५,००,०००/- रुपये पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेविरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सखाराम कडू ठाकरे वय- ५६ हे विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था, (प्रक्रिया) धुळे अति. कार्यभार विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (भूविकास बँक) जळगाव संस्था, जळगाव तथा अवसायक,महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड यावल जि. जळगाव येथे कार्यरत आहे. सध्या ते ११ राधेय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पाचोरा जिल्हा जळगाव येथे निवासाला आहेत. त्यांना सावदा येथे रंगेहात पाच लाखांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, रूपाली खांडवी, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे या पथकाने पकडले आले आहे. त्याच्या विरूध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या