Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याराज्यात २३ जूनपासून पावसाला होणार सुरुवात....!

राज्यात २३ जूनपासून पावसाला होणार सुरुवात….!

मुंबई/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्रात काही भागात पाऊस झाला. मात्र, अद्यापही मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा केली जात आहे. अद्याप पाऊस न आल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात २३ जून पासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल. सध्या मुंबई आणि कोकणच्या काही भागात तुरळक पाऊस होत आहे. देशातील वातावरणात उष्णता वाढली आहे. राज्यात देखील उष्णता वाढल्याने उष्माघात होण्याची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्रात हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाडासह अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात देखील मान्सूनपूर्व पाससाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या ठिकाणी पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, नाशिक, जालना, औरंगाबाद आणि परभणी जवळच्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसंच सांगली, बीड, लातूर, सोलापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यात पावसाची शक्यता नसल्याचे सांगत येथील तापमान वाढून उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने १८ जून ते २१ जून या कालावधीमध्ये दक्षिण पश्चिम मान्सून पुढे जाण्याची शक्यता वर्तवली आहे.या काळात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या